माजी आमदार अनिल भोसलेच्या तेरा एकर जमिनीचा लिलाव… बाजार समितीच्या घशात

पुणे प्रतिनिधी:( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. या जमिनीचा लिलाव करण्यात आला. यामध्ये बाजार समितीने ही जमीन विकत घेतली आहे.

शहराचा विस्तार वाढत असून प्रस्तावित वर्तुळाकर मार्ग, शेतकरी आणि बाजार घटकांच्या दृष्टीने सोयस्कर असा उपबाजार बांधण्याचे निश्चित करण्यात आले. अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या बाजार आवार उपलब्ध असल्यास शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचा वेळ वाचणार आहे

. त्यादृष्टीने बाजार समितीकडून जमिनीची पाहणी करण्यात येत होती, असे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी नमूद केले.गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डाच्या आवारात गाजर, मटार, मिरची, फळभाज्या, कांदा, बटाटा असा शेतीमाल विक्रीस पाठविण्यात येतो. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कोरेगाव मूळ येथील जमीन उरुळी कांचन रेल्वे स्थानक परिसरात आहे. त्यामुळे परराज्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीस पाठविणे सोपे होईल

. वाहतूक खर्चात बचत होईल तसेच गुलटेकडीतील मुख्य बाजारावर पडणारा ताण कमी होईल, या सर्व बाबींचा विचार करुन बाजार समिती लिलावात जमीन खरेदी केली. या जागेवर बाजार आवाराची निर्मिती झाल्यास बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडेल, गरड यांनी म्हटले आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कोरेगाव मूळ येथील १३ एकर जमिनीचा लिलाव करण्यात आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने लिलावात ६० कोटी ४१ लाख ७४ हजार रुपयांना १३ एकर जमीन खरेदी केली आहे.

Latest News