शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे शिंदे गटात सामील


पुणे प्रतिनिधी – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे हे काम पाहतात. पुण्याच्या शिवसेनेत कोंडे यांचे मोठे वजन असून त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठ्या संचही आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपबरोबर जात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रीपदही मिळविले आहे, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचे की मुख्यमंत्री शिंदे गटात सहभागी व्हायचे, अशा द्विधा मनःस्थितीत रमेश कोंडे होते. रमेश कोंडे यांचाच निर्णय होत नसल्याने त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत होते. अखेर कोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह कोंडे हे सोमवारी (ता.१८) मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत शिवसेनेला पुण्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे (Ramesh Konde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. रमेश कोंडे हे आज (ता.१८ जुलै) आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेतकोंडे यांना शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेल्याने खडकवासला विधानसभा मतदार संघात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
कोंडे हे मुख्यमंत्र्यांच्या गटात गेल्याने शिंदे गटाला पुण्यातून मोठी ताकद मिळाली आहे. कोंडे यांच्या या निर्णयाचे कोंडे समर्थकांनी स्वागत केले आहे.कोंडे म्हणाले, “माझा कोणावरही राग नाही. मी शिवसैनिक असून शिवसैनिकच राहणार आहे. मात्र, गेल्या साडे सात वर्षांत माझ्या मतदार संघातील अनेक कामे प्रश्न प्रलंबित आहेत. एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. माझ्या मतदार संघातील प्रश्न ते सोडवतील, याची खात्री आहे. म्हणूनच मी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज कार्यकर्त्यांसह मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.”