शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेला नाही. मात्र आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. मुंबई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आता तर खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार उपस्थितीत असल्याचा मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे. शिवसेनेचे 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर आहे. एकूण18 खासदारांपैकी 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

Latest News