कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता? रुपाली पाटील-ठोंबरें

पुणे प्रतिनिधी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये फुट पडण्यासा शरद पवारांना जबाबदार धरले.बाळासाहेबांनी हिंदुत्व वाढवलं. पण शरद पवारांनी डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला. असा आरोप करत रामदास कदम यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला

. त्यांच्या या वक्तव्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरें यांनी ट्विट करत निशाणा साधला.शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला. कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता? असा सवाल ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी बंडखोरांना केला आहे

शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला. बाबांनो तुमचे काम ,तुमचे वाद स्वतःच्या हिंमतीवर करा. असा सल्ला देत कशाला तुमचे खापर .शरदजी पवार साहेबांवर फोडता. असा सवाल पाटील-ठोंबरेंनी उपस्थित केला आहे.

Latest News