मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर रिझर्व बँकेचे निर्बंध


मुंबई | ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
भारतीय रिझर्व बँकेच्या प्राप्त माहितीनुसार हे निर्बंध रायगड सहकारी बँकेवर पुढील सहा महिन्यांसाठी लागू केले आहेत. बँकेतील बचत खाते (Saving Account), चालू खाते (Current Account) किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ग्राहकांना 15000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे निर्बंध लावण्यात आले आहेत. बँकेवर निर्बंध लागल्याने तिच्या कामकाजात फरक पडणार आहे. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द होणार नसल्याची ग्वाही रिझर्व बँकेने दिलीभारतीय रिझर्व बँकेने (RBI) महाराष्ट्रातील एका बँकेबाबत महत्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर (Raigad Co-operative Bank) रिझर्व बँकेने निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधामुळे ग्राहकांना आता फक्त 15000 रुपये काढता येणार आहेत. बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा आर्थिक फायदा लक्षात घेऊन रिझर्व बँकेने हे निर्बंध लागू केले आहेतरिझर्व बँकेच्या माहितीनुसार बँकेच्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्बंधात बदल होऊ शकतात. तसेच रिझर्व बँकेने बीड जिल्ह्यातील श्री छत्रपती शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला (Shree Chatrapati Shahu Urban Co-operative Bank) रुपये 6 लाख दंड थोटावला आहे. श्री छत्रपती शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने फसवणूक आणि अहवालाच्या संदर्भातील नियमांचे उल्लंन केल्याचा त्यांच्यवर आरोप आहे.काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची कारवाई करत रिझर्व बँकेने मुंबई स्थित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि नाशिकातील द नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक यांना दंडाचा दणका