आजचे राजकारण निर्घृण आणि घृणास्पद:उद्धव ठाकरे

मुंबई :. आज चे जे राजकारण चालले आहे ते निर्घृण आणि घृणास्पद आहे पण भाजपचे जे गुलाम होतील ते काही काळ गेल्यावर दुसरे गुलाम आपले गुलामगिरीकडे दिशा देणारी हि वाटचाल आहे. भाजपचे हे राजकारण घृणास्पद असल्याचे , दिवस फिरले तर विचार करा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे

संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिलाउद्धव ठाकरे म्हणाले, कि यांचे कर्तृत्व एकतर शून्य. यांच्याकडे आचार विचार काही नाही. हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे वक्तव्य आहे. भाजपचा वंश कुठून सुरु झाला? कारण तेच म्हणत आहेत, कि इतर पक्षात काम केलेली लोकं आपल्याकडे येत आहेत. त्यांचावंश तरी नेमका कोणता आहे?

मला संजय राऊत यांच्यावर अभिमान आहे. नड्डा ज्याप्रमाणे म्हणत आहेत, त्याप्रमाणे ते अशा प्रकारे जर राजकारण करत असतील. मान्य आहे राजकारण हे बुद्धिबळासारखे आहे. पण, इथे केवळ बळाचा वापर केला जात आहे.

त्यांच्याकडे आज ताकद आहे, त्यामुळे ते बळ वापरत आहेत. ठीक आहे, दिवस सर्वांचे सारखे नसतात. आज त्यांचे दिवस आहेत. दिवस एकदा फिरले कि विचार करा काय होईल. संजय माझा जुना मित्र आहे. आताच मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आलो.

त्याचा काय गुन्हा आहे? पत्रकार आहे, शिवसैनिक आहे. निर्भीड आहे. जे पटत नाही ते बोलतो. त्याचे एक वाक्य आहे, मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली

Latest News