पुण्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विविध उपक्रमातून अभिवादन


▪️पुण्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विविध उपक्रमातून अभिवादन ▪️ पुणे दि.१ – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त रा.स्व. संघाच्या वतीने पुणे महानगरात विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास रा.स्व. संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून घोष वादनासह अभिवादन करण्यात आले. यावेळी महानगर कार्यवाह महेश करपे, मकरंद ढवळे, अभय ठकार, सचिन भोसले, विजयराव पानगावे, प्रशांत यादव, सुनिल भंडगे, रवि ननावरे तसेच अन्य प्रांत, महानगर, भाग शाखास्तरावरील अनेक स्वयंसेवक, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, साहित्यिक उपस्थित होते. मकरंद ढवळे यांनी उपस्थित सर्वांना अण्णाभाऊंच्या कार्याविषयी सार्थ उदबोधन केले. राजेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास कात्रज भागाचे संघचालक वामनराव साखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी सामाजिक समरसता मंचाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतांचे संयोजक नंदकुमार राऊत यांनी अण्णाभाऊ साठेंच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी कोंढवा नगराचे संघचालक अशोकराव शिंदे, संजय कुलकर्णी, आण्णा जगदाळे, अशोक शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. सुनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.धायरी येथील मल्हार पादुका चौक तसेच शिवाजीनगर मुळा रोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ यांना अभिवादन करण्यात आले.