भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये बीबीए,बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम


भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये बीबीए,बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम
नवीन शैक्षणिक वर्षास उत्साहात प्रारंभ
पुणे :
भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट( आयएमईडी) मध्ये बीबीए,बीसीए अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. १ऑगस्ट रोजी इंडक्शन प्रोग्रामचा प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या नव्या तुकडीच्या पायाभरणीसाठी शैक्षणिक,कारकीर्द विषयक,समुपदेशन आणि क्रीडा विषयक सत्रांचे आयोजन या कालावधीत करण्यात आले आहे. भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते .
क्रिएटिव्ह आर्ट थेरपी तज्ज्ञ नेहा ओसवाल-बाफना ,प्रसिद्ध वक्त्या पूजा भाले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आसावरी भावसार,डॉ रामचंद्र महाडिक,डॉ दीपक नवलगुंद,डॉ नेताजी जाधव,डॉ सचिन आयरेकर,डॉ हेमा मिर्जी,डॉ प्रमोद पवार,संगीता पाटील,रिशो अगरवाल,श्रेयस डिंगणकर यांचीही सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी ,प्राध्यापक उपस्थित होते. भारती विद्यापीठाच्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला. डॉ. रामचंद्र महाडिक, डॉ. स्वाती देसाई, डॉ. सुचेता कांची, डॉ. हेमा मिरजी यांनी संयोजन केले.