मानवी प्रगतीचा नवा पैलू म्हणून आनंद आणि स्वास्थ्याचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी जीआयआयएस हडपसरने साजरा केला हॅप्पीनेस वीक

मानवी प्रगतीचा नवा पैलू म्हणून आनंद आणि स्वास्थ्याचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी जीआयआयएस हडपसरने साजरा केला हॅप्पीनेस वीक
पुणे: ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) हडपसर कॅम्पसने आनंदाचे महत्त्व आपले व्यक्तिमत्व साजरे करण्याची गरज विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी आणि अनेक उपक्रमांच्या मालिकेमध्ये गुंफलेला आनंद सप्ताह अर्थात हॅप्पीनेस वीक साजरा केला.
नर्सरीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या ८२८ हून अधिक विद्यार्थ्यांनी २५ ते २८ जुलै २०२२ दरम्यान भरविण्यात आलेला ‘हॅप्पीनेस वीक’ साजरा केला. या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांना आपले व्यक्तिमत्व साजरे करण्याची आणि दृश्य माध्यमांतून स्वत:ला व्यक्त करण्याची मोकळीक देणारे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या हाताच्या तळव्यांचे छाप कागदावर उमटवले आणि स्वत:च्या स्वभावातील पाच सर्वोत्तम गुणवैशिष्ट्यांची नावे त्यात लिहिली, ‘हू अॅम आय’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून ते स्वत:विषयी बोलते झाले, त्यांनी चर्चासत्रांमध्ये भाग घेतला, कलात्मक वस्तू तयार केल्या व लिखाणही केले. विद्यार्थ्यांनी विचारमंथन केले आणि ते स्वत:कडे कशाप्रकारे पाहतात याच्या नोंदी केल्या, आपण कोण आहोत हे स्पष्ट करणारी कोलाज तयार केली. घरात आणि वर्गांमध्ये अनुभवलेल्या भावभावनांची नोंद करण्यासारख्या रोचक उपक्रमांचाही यात समावेश होता.
याखेरीज लाफ्टर योगा, हसू आणणा-या गोष्टींची चित्रे काढणे, विनोदी संवाद तयार करणे, आपापसांत बोलणे, हॅप्पीनेस कोलाज बनविणे, ग्रॅटिट्यूड जार बनविणे, आनंदाची नोंदवही बनविणे आणि लाफ्टर थेरपीसारखे कार्यक्रमही आठवडाभर सुरू होते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये विद्यार्त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते आणि त्यांचे विषय मन ताजेतवाने करण्याच्या संकल्पनेशी मेळ साधणारे होते.
या प्रसंगी ऑपरेशन्स विभागाचे डायरेक्टर राजीव बन्सल म्हणाले, “जीआयआयएसमध्ये मौजेचा आणि आनंददायी अभ्यासक्रम देणे हे आमचे मूळ तत्व असल्याने इथे शिकण्याची प्रक्रिया अतिशय सर्जनशील असते व विद्यार्थ्यांसाठी शिकणे ही एक आनंदाची व अनुभवण्याची गोष्ट बनते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वांना वाढत्या वयाबरोबर विकसित होण्याची मोकळीक देण्यासाठी आमच्या ९जेम्‍स अध्यापनपद्धतीच्या माध्यमातून आम्ही विविध वयोगटांना साजेशा व स्वीकारता येण्याजोग्या पद्धतींचा वापर करणा-या ख-या अर्थाने नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमाची हमी देतो. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आनंद आणि स्वास्थ्य यांच्या महत्त्वाविषयीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे हा सप्ताह साजरा करण्यामागचा विचार आहे.”

Latest News