महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारे ‘मैत्रेयी भव्य प्रदर्शन ‘ 12 ऑगस्ट पासून


………………
सणासुदीच्या तयारीसाठी महिला उद्योजकांचे प्रदर्शन
पुणे :
सणासुदीच्या तयारीसाठी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारे, गृहिणींना एका ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध करून देणारे ‘मैत्रेयी ‘ प्रदर्शन 12 ऑगस्ट पासून कृष्ण सुंदर लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे.
मैत्रेयी महिला उद्योगिनी संस्थेचे हे चौथे भव्य प्रदर्शन 12 ते 14 ऑगस्ट रोजी डीपी रोड ( कर्वेनगर )वरील कृष्ण सुंदर लॉन्स वर होत आहे. महिलांसाठी कार्यरत ही सहकारी संस्था असल्याने सर्व माध्यमातून महिला उद्योजकांना वाव दिला जातो
तसेच ११५ महिला उद्योजकांचे एक व्यासपीठ तयार करण्यात आले असून या माध्यमातून महिलांना उद्योगा साठी सर्व प्रकारची मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे सौ. विद्या घटवाई,सौ. रेवती मांडके यांनी सांगीतले.
ग्राहक उपयोगी वस्तूंचे 50 पेक्षा जास्त स्टॉल , दालने येथे मांडण्यात येणार असून खाद्य पदार्थांची पण रेलचेल असणार आहे.सर्व प्रकारचे ड्रेस, कापड, ज्वेलरी, सणासुदी साठी चे पूजे चे साहित्य, गणपती सजावट सामान, खाण्याचे स्टॉल असणार आहेत.
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रेयी च्या सर्व प्रदर्शनाला ग्राहकांचा आणि विक्रेत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे , त्यातून महिला सक्षमीकरणासाठी उपयोग होत असल्याचे मैत्रेयी संस्थेच्या सौ विद्या घटवाई आणि सौ रेवती मांडके यांनी सांगितले.
महिला उद्योजकांना अर्थसहाय्य योजनाची माहिती देण्यासाठी बँकांचे स्वतंत्र कक्ष या प्रदर्शनात असतील.
संयोजन समितीत सौ तृप्ती तारे, सौ रसिका घाणेकर,सौ मधुरा बर्वे, सौ लता दवे, अनिता जोशी, सौ रुपाली जोशी, यांचा समावेश असून तयारी पूर्ण झाली आहे.
महिला उद्योजकांना सहभागासाठी विद्या घटवाई ९८५०६८०९२४ ,रेवती मांडके ९३२२३२८२२६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.