भाजप आणि मोदींकडून लोकशाहीची हत्या होत आहे- प्रणिती शिंदे

सध्या जे देशात सुरू आहे, ते लोकशाहीला घातक असून भाजप(BJP) आणि मोदींकडून (PM Narendra Modi) लोकशाहीची हत्या होत आहे. केंद्रीय संस्थांचा वापर कशा प्रकारे होत आहे, हे देशातील नागरिक पाहात आहेत. सध्या हम बोले सो कायदा अशी परिस्थिती आहे, हे जर असंच सुरू राहिलं तर देशात हुकूमशाहीचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. राजकीय स्वार्थासाठी राजकारणाची पातळी खालावली आहे, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार टीका केली आहे.सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना केवळ त्रास देण्यासाठी त्यांची चौकशी केली जात आहे. अनेक वेळा चौकशीसाठी अधिकाऱ्यांना घरी पाठवावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली होती, मात्र चौकशीतून काहीही सिद्ध झाले नाही. तरीही केवळ त्रास देण्यासाठी त्यांना ईडी चौकशीसाठी बोलावले जात आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्याराज्यात नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यात काँग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी(Soniya Gandhi) यांचीही ईडीकडून चौकशी सुरू असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशात काही ठिकाणी आंदोलने होत आहेत. ईडीकडून होत असलेल्या चौकशीवरून अनेकजण भाजपवर टीका करीत आहेत. त्यात आता खासदार प्रणिती शिंदे(Praniti Shinde) यांनीही भाजपला यावरून चांगलेच धारेवर धरले आहेदरम्यान, केंद्रीय संस्थांचा वापर अशा प्रकारे कोणीही केला नव्हता. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर त्याच्यामागे ईडी लावायची, जो कोणी यावर आवाज उठवेल त्याच्यावर कारवाई करायची हे ठरलेलं आहे. मात्र हे अधिक दिवस चालणार नाही,