राज्य सरकाराच्या पाठीशी केंद्रातील मोदी सरकार भक्कम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि शिवसैनिकांची महाविकास आघाडी सरकारबद्दल तक्रार मांडत होते. राष्ट्रवादीच्या निधी वाटपाने सारे वैतागले होते. शिवसैनिकांचे खच्चीकरण पाहवत नव्हते. त्यामुळे आमच्यावर उठाव करण्याची वेळ आली. तसेच, ‘धर्मवीर’ चित्रपट आला. मात्र तो काहींना तो रुचला नाही. आता अजूनही धर्मवीर – पार्ट 2, 3 येऊ शकतो.अशा घटना भविष्यात समोर येऊ शकतात, असे सुचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केल आहे
शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, शिवसेनेत कोणी नेते भेटत नव्हते, मात्र आपण भेटत होतो. आमदार, खासदार आणि शिवसैनिक महाविकास आघाडी सरकारबद्दल तक्रार मांडत होतो. राष्ट्रवादीच्या निधी वाटपाने सारे वैतागले होते. शिवसेना पक्ष म्हणून चार नंबरवर गेली. शिवसैनिकांचे खच्चीकरण पाहवत नव्हते. त्यामुळे आमच्यावर उठाव करण्याची वेळ आली.
शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला, .तसेच, धर्मवीर मु.पो. ठाणे आला. काहींना तो रुचला नाही. आता अजूनही धर्मवीर -पार्ट 2, धर्मवीर – पार्ट 3 येऊ शकतो. अशा घटना भविष्यात समोर येऊ शकतात. हे युती सरकार अडीच वर्षे विलंबाने आले. आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीतून निसटल्याने इथून पुढे शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागणार नाही.
माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शेतकरी जनसंवाद मेळावा आज (ता. 2 ऑगस्ट) पालखीतळावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.पुरंदर-हवेलीचे नेते शिवतारे यांनी सूचविल्याप्रमाणे पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय छत्रपती संभाजी महाराज विमानतळ देखील विरोध असलेल्या पारगावला वगळून उर्वरीत गावांची शेतकरी संमती घेऊनच होईल.
समृ्द्धी महामार्गाच्या धर्तीवर आपण प्रस्ताव घेऊन शेतकऱयांसाठी मान्य होईल असा मोबदला (दर) जाहीर करुन कार्यवाही करु. विमानतळ दुसऱ्या कोणी (बारामतीकरांनी) आपल्याकडे नेण्याचा विषयच राहणार नाही. कारण आता आपण मुख्यमंत्री आहोत,अशा शब्दात शिंदेंनी यांनी पुरंदरमधील मुळ जागेच्या प्रस्तावासही सकारात्मक प्रतिसाद दिला
देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकाराच्या पाठीशी केंद्रातील मोदी सरकार भक्कम आहे. पैसा कोठेही कमी पडणार नाही, याची हमी घेऊनच सूत्रे हाती घेतली आहेत. ही जनतेने निवडुण दिलेल्या शिवसेना-भाजपच्या नैसर्गिक युतीचे सरकार आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, शिंदे यांनी बंड केल्यानंतर सातत्याने त्यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. गद्दार, रेडा तसेच बंडखोरांचा बापाचा उल्लेख देखील करण्यात येत आहे. यावर आता शिंदे देखील आक्रमक होत असून त्यांनीही समोरून टीका होतच राहिली तर मी मुसाखत दिली तर भूकंप होईल. तसेच आनंद दिघेंबाबत काय घडलं हे आपल्याला माहित असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता आज त्यांनी धर्मवीर चित्रपटाचे अजूव पार्ट येऊ शकतात हे सांगत शिवसेनेला सुचक इशारा केला तर नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.