पिंपरी चिंचवड महापालिकेत ACB ची रेड, नगररचना विभागाचा सर्व्हर जाळयात


पिंपरी चिंचवड महापालिकेत ACB ची. रेड,,
नगररचना विभागाचा सर्व्हर जाळयात
……पिंपरी (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड
महापालिकेच्या नगररचना विभागातील सर्वेअरला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी अडीचच्या सुमारास झाली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.
संदीप लबडे असे लाच मागणाऱ्या सवेंअरचे नाव आहे. लबडे याने एकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. महापालिकेच्या नगर रचना विभागात यापूर्वीही लाचलुचपत विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात लबडे हे सर्वेअरने म्हणून कार्यरत आहेत. वाकड येथील एका खासगी जागेतील डीपी प्लॅन बदलण्यासाठी खाजगी जागेतून डीपी जात होता हा रस्ता जाऊ नये यासाठी दोन लाखाची मागणी करण्यात आली होती माञ हा आर्थिक व्यवहार होण्याअगोदरच पोलिसांनी पालिकेत धाड टाकून आरोपीला अटक केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात बडे हे सर्वेअरने म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एकाकडे दोन लाखांपेक्षा अधिक लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती. मात्र, बुधवारी दुपारीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लबडे याला ताब्यात घेतले आहे. लबडे याने कोणत्या प्रकरणात लाच मागितली होती, याची अद्याप माहिती समोर आली नाही.
मात्र, या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.