रातराणी रिक्षा स्टँडच्या नवीन नामफलकाचे उदघाटन,*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने फिरणाऱ्या बाबा कांबळे यांच्या फोटोचा समावेश*


*रातराणी रिक्षा स्टँडच्या नवीन नामफलकाचे उदघाटन*- *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने फिरणाऱ्या बाबा कांबळे यांच्या फोटोचा समावेश*
*पिंपरी / प्रतिनिधी*पिंपरी येथील रातराणी रिक्षा स्टँडच्या वतीने नाम फलकात बदल करण्यात आला आहे. “बाबा कांबळे यांचा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. हा 1997 सालचा फोटो रिक्षा स्टँडच्या मुख्य फलकावर लावण्यात आला. 1 ऑगस्ट रोजी या नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बाबा कांबळे यांच्या हस्ते नवीन फलकाचे अनावरण करण्यात आले.बाबा कांबळे यांचा रिक्षाच्या समोर उभा असलेल्या कार्यक्रमाचा फोटो महाराष्ट्रसह देशभर व्हायरल झाला. हा फोटो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असल्याच्या चर्चा रंगल्या. यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा कांबळे यांना फोन केला.
यावेळी बाबा कांबळे यांनी रात्र आणि शिक्षण या बद्दलची माहिती दिली. यामुळे रातराणी रिक्षा स्टॅन्डची देशभर चर्चा झाली. यामुळे रिक्षा चालक रात्र रिक्षा स्टॅण्ड कुठे आहे ? याबद्दलची माहिती घेऊ लागले. पिंपरी चिंचवड शहरातील व पुणे शहरातील अनेक रिक्षा चालकांनी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर असलेल्या स्टँडला भेट द्यायला सुरुवात केली.
याचा रिक्षा चालकांना मोठा आनंद झाला. त्यामुळे रातराणी रिक्षा स्टॅन्ड वरील रिक्षा चालकांनी चर्चेत असलेल्या या फोटोचा नवीन नामफलकात समावेश केला. त्याचे बाबा कांबळे यांच्या हस्ते 1 ऑगस्ट अण्णा भाऊ यांच्या जयंतीनिमित्त अनावरण करण्यात आले
.या वेळी माजी महापौर नगरसेवक तुषार हिंगे, यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व अन्नदान वाटप करण्यात आले,माझी प्रभाग सदस्य हमिद शेख,माजी नगरसेवक उत्तम हिरवे,ज्येष्ठ नागरिक संघाचे ब.अर.माडगूळकर, विजय वांजळे,गणेश साळुंखे, चंद्रकांत बोचकुरे, बळिराम काकडे,उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी, रातराणी रिक्षा स्टॅन्डचे अध्यक्ष इकबाल शेख, डॉ बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टॅन्डचे अध्यक्ष गोकुळ रावरकर, उपाध्यक्ष राहुल क्षीरसागर सचिव योगेश साळवे, सहसचिव अतुल पवार. यांनी परिश्रम घेतले,यावेळी रात्र आणि रिक्षा स्टॅन्डचे ज्येष्ठ रिक्षा चालक साहेबराव काजळे राजू तांबेकर यांचा सन्मान देखील तुषार हिंगे यांच्या हस्ते करण्यात आला,