E.D म्हणजे NO जामीन : छगन भुजबळ

मुंबई : (. ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

भुजबळ मनी लाँड्रींग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड तुरुंगात होते. पत्राचळ घोटाळा प्रकरणी राऊतांवर मनी लाँड्रींगचे आरोप झालेत. 14 मार्च 2016 ते 4 मे 2018 पर्यंत भुजबळ जेलमध्ये होते. दोन वर्षे एक महिना 21 दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला होता. मनी लाँड्रींग प्रकरणात माजी मंत्री अनिल देशमुखही आर्थर रोड जेलमध्ये आहेत. 6 नोव्हेंबर 2021 ला देशमुख आर्थर जेलमध्ये गेलेत. 8 महिने 28 दिवसांपासून अजूनही त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यानंतर ईडीनं आपला मोर्चा नवाब मलिक यांच्याकडं वळविला. मलिकही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही.  ईडी म्हणजे नो जामीन, असा अनुभव माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितला

7 मार्च 2022 ला मलिक आर्थर रोड जेलमध्ये आले. ४ महिने 27 दिवसांपासून ते आर्थर रोड जेलमध्येच आहेत.

Latest News