चिंचपूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला, शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा

सोलापूर |ऑनलाइन परिवर्तनाचा सामना – सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर ग्रामपंचायती शिवसेनेच्या उद्धव ठाकरे(गटाचे सात पैकी सात सदस्य निवडून आले आहेत. दक्षिण सोलापूर तालुका युवासेना प्रमुख धर्मराज बागले यांनी चिंचपूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे
दुसरीकडे सोलापूर जिल्हातील बार्शी(Barshi) तालुक्यात मात्र दोन्ही ठिकाणी भाजप समर्थक अपक्ष आमदार राऊत गटाचा विजय झाला आहे, तर माजी आमदार दिलीप सोलप यांच्या गटाचा पराभव झाला आहे. पानगाव ग्रामपंचायतीत राऊत गटाचे 11 तर सोपल गटाचे 4 सदस्य निवडूण आलेत. तसेच वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीत सातही जागांवर राऊत गटाचा विजय झाला आहे.शिवसेनेचे फुटीर आमदार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत(BJP) सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर शिवनेनेचे(shivsena) अनेक नगरसेवक, आमदार, खासदार हे शिंदे गटात सामिल झाले आहेत. तसेच शिंदे गटही खरी शिवसेना आमची असा दावा करत आहे. त्यामुळे शिवसेनेला आतापर्यंत अनेक धक्के बसले आहेत. त्यातच आता ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहेदरम्यान, खरी शिवसेना कोणाची या वादसह पाच याचिकांवर 8 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होणार आहे. ठाकरेंसाठी ही सुनावणी अत्यंत महत्वाची मानली जात आहे, कारण शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यास ठाकरेंकडील शिवसेनेचे नाव आणि पक्षप्रमुख पदही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.