संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी… चित्रा वाघ

मुंबई (. ऑनलाइन परिवर्तनाचा सामना ). – संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ”पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे,” असे ट्विट करत वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतच त्यांनी @CMOMaharashtra लाही हे टॅग केले आहे

. तसेच, हेमंत देसाई यांनीही राठोड यांच्या मंत्रीपदावर नाराजी व्यक्त केली आहे. ” ज्या संजय राठोड यांच्यावर देवेंद्रजी, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ प्रभृतींनी सडकून टीका केली होती आणि त्यांचा ठाकरे सरकारमधून राजीनामा मागितला होता, ते राठोड आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री बनले आहेत. नवनिष्कलंक संजय राठोड आणि संस्कारी पक्षाचा विजय असो,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या विस्तारात संजय राठोड यांचा समावेश झाल्याने त्याविषयी विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही काही संशयातील व्यक्ती मंत्रीमंडळात नसत्या तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

त्यावर संबंधित पत्रकाराने कोणाचे नाव तुम्ही घेता आहात, असा प्रश्न विचारल्यावर ते नाव तुला माहीत, असे उत्तर त्यांनी दिले. राठोड यांचे नाव घेण्याचे अजितदादांनी टाळले. इतर मंत्र्यांना देखील संजय राठोड यांच्या नावाबद्दल विचारले असता त्यांनी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचे असल्याचे सांगत त्यावर भाष्य टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना गेल्या सरकारने क्लिन चीट दिली असल्याचे स्पष्ट केले.

सत्तार यांचे आज सकाळपर्यंत मंत्रिमंडळाच्या यादीत नाव नव्हते. टीईटी घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांचे नाव जवळपास मंत्रिमंडळाच्या यादीतून वगळण्यात आले होते. मात्र सत्तार आक्रमक होताच त्यांचा ऐनवेळी मंत्रिमंडळाच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची बढती मिळाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Latest News