एकाही महिलेला संधी मिळाली नाही,अतिशय खेदजनक – सुप्रिया सुळे

मुंबई – ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-

राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टीका करत थेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. “स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही.

मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांवर विरोधकांसह भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही टीका केली. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

भाजप नेत्या माधुरी मिसाळ यांना पुन्हा धक्का बसला आहे. मंत्रिमंडळाच्या यादीत सुरुवातीला त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. ही २०१४ ची पुनरावृत्ती मानली जात आहे. २०१४ ला रेखा ठाकूर यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे आता पुण्यातून फक्त चंद्रकांत पाटील यांना संधी मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.

आमदार बच्चु कडू यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत आलेले नाही. मंत्रिपदासाठी ते आग्रही होते. मात्र साडेदहा पर्यंत तरी यादीत नाव न आल्याने ते नाराज झाले आहेत. त्यामुळे आता ते काय भूमिका घेणार याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. तर दूसरीकडे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे नाव मंत्रीपदाच्या यादीत आले आहे. यड्रावकर अपक्ष असून त्यांना संधी मिळाली. त्यामुळे आता यावर बच्चु कडू काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Latest News