ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन..


मुंबई :. मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. हदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे
. मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिका यातून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या प्रदीप यांची ओळख मोरुची मावशीमुळे प्रेक्षकांच्या मनावर ठसली होती. त्यामुळे त्यांना ओळखले जाऊ लागले. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर गंभीर स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
गिरगावात राहणाऱ्या प्रदीप हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वापासून अलिप्त होते. त्यामागील कारण त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय, आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या प्रदीप यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात मोकळी पोकळी निर्माण झाली आहे. प्रदीप यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये मोरुची मावशीचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल