पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिसांची संजय राठोड यांना क्लिनचीट: -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई – ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. राज्यातील नव्या सरकारातील मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला असून पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या 9 आणि भाजपच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या संजय राठोड यांनीही शपथ घेतली आहे. संजय राठोडांच्या शपथविधीनंतर भाजपच्या चित्रा वाघांनी टीका करत पूजा चव्हाण प्रकरणातील माझा त्यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना मंत्रिमंडलात स्थान का देण्यात आले यावर स्पष्टीकरण दिले आहेशिंदे म्हणाले की, मागील मविआ सरकारमध्ये तरुणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी राठोड यांनी क्लिनचीट दिली होती. त्यांना क्लिनचीट दिल्यामुळेच राठोड यांना आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय जर कुणाचं काही मत, विचार असतील तर, नक्कीच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रा वाघ यांच्या विधानावर दिले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कोणाचं काही म्हणणं असेल तर ते ऐकून घेतलं जाईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.