पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाऱतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजक पदावर नियुक्ती…

पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

महापालिकेत २०१७ साली भाजपाची सत्ता आल्यानंतर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर महापौर झाले. तब्बल अडीच वर्षे त्यांच्याकडे महापौरपद होते. पुणे भाजपातील येत्या काळातील एक महत्वाचे नेतृत्व म्हणून मोहोळ यांच्याकडे पाहिले जाते. आणखी दीड वर्षांनी लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपाचे खासदारकीचे उमेदवार म्हणून मोहोळ यांचे नाव अग्रभागी आहे, असे मानले जाते. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. येत्या फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या पदाची मुदत होती. मात्र, मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्याजागी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली.नव्या प्रदेशाध्यक्षांनी नव्या नेमणुका केल्या आहेत.या नेमणुकांमध्ये मोहोळ यांच्या नेमणुकीचा समावेश आहेपुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भाऱतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजकदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. मोहोळ यांच्या नियुक्तीने भाजपाअंतर्गत गोटात आश्‍यर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील राजकारणात भाजपाचे महत्वाचे नेतृत्व असलेल्या मोहोळ यांच्याकडे नेत्यांचे दौरे आणि सभांचे नियोजन सोपविणे हे आश्‍यर्य व्यक्त करण्याचे कारण मानले जात आहेभाजपाच्या संघटनात्मक रचनेत विविध समित्या असतात. त्यापैकी केंद्रीय नेता प्रवास योजना समिती आहे. केंद्रीय नेत्यांचा संबंधित राज्यातील प्रवास, सभा आणि संपूर्ण दौऱ्याच्या समन्वयाची जबाबदारी संयोजक तसेच सहसंयोजकांकडे असते. येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदा व लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. मोहोळ हे पुणे लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडेच प्रवास योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे हे आश्‍यर्य वाटण्याचे कारण मानले जात आहे.

Latest News