अरविंद एज्युकेशन सोसायटीत विधिवत पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना

IMG-20220901-WA0133

अरविंद एज्युकेशन सोसायटीत विधिवत पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना
पिंपरी, प्रतिनिधी :
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, भारतीय विद्या निकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठाना करण्यात आली.
संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव यांच्यासह मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फुलांच्या पायघड्या घालीत वाजतगाजत गणरायाची मूर्ती आणण्यात आली. ‘संस्थेतील सर्व शिक्षकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत गणरायाचे स्वागत केले.
दरम्यान, संस्थेचे सचिव प्रणव राव लिखित ‘अ टेल ऑफ अरेंज्ड मॅरेज’ या पुस्तकाला राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थेतील सर्व शिक्षकांच्या वतीने प्रणव राव यांचा सत्कार करण्यात आला.
गणपती प्रतिष्ठापनेसाठी भटू शिंदे, उदय फडतरे यांनी नियोजन केले. तर कला शिक्षिका दर्शना बारी, संध्या पवार यांनी गणपतीची सजावट केली आहे.

Latest News