मी मनातून पराभूत होत नाही, तोपर्यंत माझा बाल हि बाका होणार नाही:. पंकजा मुंडे


बीड 🙁 ऑनलाइन परिवर्तनाचा सामना )
-मी कमी पडली असेल. मात्र, त्याची जाणीव करून दिली जात आहे, अशी खंत व्यक्त केली.मुंडे साहेबांच्याही वाट्याला पराभव आला होता. तो पराभव माझ्या देखील वाट्याला आला. त्या पराभवाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. जोपर्यंत मी मनातून पराभूत होत नाही, तोपर्यंत माझा बाल हि बाका होणार नाही. तिरंगी लढत झाली असती तर सीट लागली असती, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत
पंकजा मुंडे बीडमध्ये (Beed) बोलत होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. परळीची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. हा पराभव पंकजा यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.
मात्र, पक्षातील नेते प्रत्येक वेळी परळी संभाळा असा सल्ला देत असल्याचे सांगत पंकजा यांनी नाराजी व्यक्त केलीतसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना संपूर्ण आयुष्यात साडेचार वर्ष सत्ता मिळाली. म्हणून थांबले का साहेब, कोणासमोर झुकले का साहेब, त्याच प्रमाणे मी थकणार नाही,
रुकणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. पंकजा मुंडे यांना शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. त्यावरुन मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.पक्षातील नेते घुमून फिरून मला परळी को संभालो, असे म्हणतात.. झाली एकदा चूक ती किती महागात पडली