पुण्यातून लोकसभेच निवडणूक लढवणार नाही- देवेंद्र फडणवीस


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पुण्याचे दोन भाग होणार, हा नवीन वाद कशाला काढता आहात. जेव्हा करायचे आहे, तेव्हा बघू. राज्य सरकारपुढे आज तरी पुण्याबाबत असा कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र, आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार सध्या नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचं आहे, असे फडणवीसांनी या वेळी निक्षून सांगितले.फडणवीस म्हणाले की, तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे काय? मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही आणि पुण्याची लोकसभाही लढवणार नाही. त्या फक्त माध्यमातील चर्चा आहेत. पक्षात त्याबाबत कसलीही चर्चा नाही. राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची विद्यमान मंत्री मंडळात वर्णी लागणार का, या प्रश्नावर मात्र फडणवीस यांनी मौन बाळगणे पसंत केलेपुणे : मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही आणि पुण्यातून लोकसभेच निवडणूकही लढवणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.फडणवीस हे पुण्यात इलेक्ट्रीक बसच्या चार्जिंग स्टेशनच्या उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील घोषणा केली. नवे सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच, ब्राह्मण महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेचे तिकिट द्या, अशा मागणीचे पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविले हेाते. त्यामुळे फडणवीस पालकमंत्री होणार आणि लोकसभा निवडणूक लढविणार, याबाबत चर्चा रंगली होती. त्याला खुद्द फडणवीस यांनीच पूर्णविराम दिला आहेमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीबाबत फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्याशी माझी भेट झालेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहोचलो होते. नेमके त्याचवेळी तेही पोहोचले. मात्र, त्यांची आणि माझी कुठेही भेट झालेली नाही