पुणे महानगरपालिकाही राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी महापालिका ठरली, आकाराचा आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे दोन भाग व्हायला – चंद्रकांत पाटील

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

पुणे महापालिकेत २३ नव्या गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे पुणे एक मोठे महानगर झाले आहे. मात्र, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पुण्याचे दोन भाग करण्याची माझी भूमिका राजकीय नाही. मात्र, कोणतेही टुनिट जितके छोटे तितके काम करायला अधिक सोपे असते, असा अनुभव आहे अस मत. मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी व्यक्त केले

गोवा राज्य छोटे असल्याने तिथल्या लोकप्रतिधींचा सर्वांशी वैयक्तिक संबंध येतो. त्यातून प्रश्‍न लवकर सुटण्यास मदत होते.तिथला मुख्यमंत्री बायकोने सांगितले की मासळी बाजारात जाऊन मासेवाल्याला जाऊन भेटतो.छोटे राज्य असल्याने हे सारे शक्य असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले शहराचा विचार केला तर पुणे महानगरपालिका ही आकाराने राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे.

आकाराचा आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे दोन भाग व्हायला हवेत, अशी भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात मांडली चांदणी चौकातील वाहतुकीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘ चांदनी चौकामध्ये रस्ता सहा लेनचा होत नाही तोपर्यंत मोठ्या गाड्यांना बंदी हे उत्तर नाही. मोठ्या वाहनांना एका लेनमधून जाण्यासाठी परवानगी द्यायला हवी,

दोन स्वतंत्र लेन छोट्या चारचाकी वाहनांसाठी दिल्या तर त्या गाड्या लवकर जातील आणि दुसऱ्या लेनमधून टेम्पो-ट्रक जाऊ शकतील.’’ विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्त्या करताना जुन्या विद्यापीठ कायद्यानुसार केल्या जातील. नवा कायदा अस्तित्वात नाही. राज्यपालांनी नव्या कायद्यावर स्वाक्षरी केलेली नाही. सध्या जुना विद्यापीठ कायदा अस्तित्वात असल्याने या कायद्यानुसार चार विद्यापीठांच्या कुरूगुरूंची निवड प्रक्रिया होईल, असे पाटील यांनी सांगितले.

Latest News