आमचा एकाही आमदाराला खरेदी करु शकले नाही… मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल


नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने विधानसभेत बहुमत प्रस्ताव जिंकला आहे. या प्रस्तावाच्या बाजुने 58 मते पडली असून विरोधात एकही मत पडलं नाही. हा बहुमत प्रस्ताव जिंकल्यावर भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ अपयशी ठरल्याची टीका केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना केली उपसभापतींसोबत झालेल्या वादानंतर भाजपच्या पाच आमदारांनी त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांना सभागृहातून बाहेर काढल्यानंतर त्यांनीही सभात्याग केला. यामुळे त्यांच्या बाजूने एकही मत पडलं नाही. सभागृहात उपस्थित असलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) सर्व आमदारांनी अपेक्षेप्रमाणे प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले
. यामुळे आपने सहज विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला आहे.भाजप आमदार – विजेंदर गुप्ता, अभय वर्मा आणि मोहन सिंग बिश्त यांचा उपसभापती राखी बिर्ला यांच्याशी वाद केल्यामुळे त्यांना मार्शल आउट करण्यात आले
. त्यामुळे बाकीच्या आमदारांनीही सभागृहातून बाहेर पडले होते.केजरीवाल म्हणाले, भाजपची देशातील 8 ते 10 विरोधी सरकारांवर नजर असून या सरकारांमधील आमदारांना वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मात्र दिल्लीतही अशा आॅफर्स देण्याचा प्रकार झाला होता. मात्र ते आमचा एकाही आमदाराला खरेदी करु शकले नाही. आमच्या बाजुने 58 मते पडली असून भाजपच्या बाजूला एकही मतं पडलं नाही, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांचे केजरीवाल यांनी जोरदार समर्थन केलं. त्यांनी भ्रष्टाचार केला असता तर त्यांच्या घरी पैसा सापडला असता. सीबीआयने छापेमारी करुनही त्यांना काहीच सापडलेले नाही. भाजपने शिसोदियांना बदनाम करण्यासाठी तपास यंत्रणाचा गैरवापर केला आहे. भाजपने आमदारांना खरेदी करण्याची पध्दत बंद करावी, अशी आमची मागणीअसून पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करा याबरोबरच शेतकरी, विद्यार्थ्यांचे कर्ज कमी केले जावे, अशा मागण्याही केल्या आहेत.