नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेसला शेगांव स्थानकावर थांब्याची मागणी: ओमकार माळगांवकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना–

गणेशोत्सवाकरीता सुरू करण्यात आलेल्या०११३९/०११४० नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेसला शेगांव स्थानकावर थांब्याची राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव सरचिटणीस वैभव बहुतूले,संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांची मागणी
नांदुरामध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेली नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेस मनमाड,चाळीसगाव,नांदुरा,शेगांव,मूर्तीजापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव,कल्याण ते सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय मुंबई ,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव सामाजिक व राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे
मुंबई कोलकाता लोहमार्गावर भुसावळ डिव्हिजनमध्ये रेल्वे विभागाला दरवर्षी कोट्यावधी रुपयाचे उत्पन्न देणाऱ्या शेगांव रेल्वे स्थानक हे प्रमुख रेल्वे स्थानक असुन लाखो भाविकांचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गजानन महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दररोज शेकडो प्रवासी रेल्वेने प्रवास करून शेगाव रेल्वे स्थानकावर उतरत असतात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या लक्षात घेऊन विदर्भातील प्रवाशांना कोकणात व कोकणातील लोकाना विदर्भात पर्यटकांना येण्या-जाण्यासाठी सुविधा व्हावी या करीता मध्य रेल्वेकडून ०११३९/०११४० नागपुर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे
सदर रेल्वेसेवेला वर्धा जं,पुलगाव,धामणगाव,बडनेरा,अकोला जं,मलकापूर,भुसावळ जं,नाशिक रोड,कल्याण जं,पनवेल जं,खेड,चिपळूण,रत्नागिरी,वैभववाडी रोड,कुडाळ,सावंतवाडी रोड,थिवीम पर्यंत आदी स्थानकावर थांबा देण्यात आले आहेत
मात्र शेगाव रेल्वे स्थानकाला कोटयावधीचा महसुल मिळवुन देणाऱ्या शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा नागपुर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला थांबा देण्यात आलेला नाही कोकण परिसरात शेगांव निवासी श्री संत गजानन महाराज यांना मानणारा भाविक वर्ग मोठ्या संख्येने राहतो त्याप्रमाणे विदर्भातील खामगाव बाळापूर अकोट तेल्हारा जळगाव संग्रामपूर चिखली आदी विविध तालुक्यातील राहिवाशांना कोकण भागातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी ०११३९/०११४० नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेसला शेगाव स्थानकात थांबा दिल्यास कोकण ते खान्देश विदर्भ या भागात येणे शक्य होईल शेतकऱ्यांकडून होणाऱ्या शेतीमाल कोकण ते खान्देश विदर्भ व खान्देश विदर्भ ते कोकण या भागात आयात-निर्यात करण्यास मदत होणार आहे
या सर्व बाबींचा रेल्वे प्रशासनाने विचार करून शेगांव व अन्य स्थानकावर थांबा विचार करून ०११३९/०११४० नागपुर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला थांबा मंजुर करावा अशी मागणी कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब, प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव अध्यक्षा शबनम शेख,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव संघटनमंत्री ओमकार माळगांवकर,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव पेण संपर्कप्रमुख हर्षद भगत,कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई ठाणे कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी आदींनी प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव, रेल राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे,रस्ते सडक वाहतूक महामार्ग राजमार्ग दळणवळण परिवहनमंत्री नितीन गडकरी,चंद्रपूर खासदार बाळु भाऊ धानोरकर,गडचिरोली खासदार अशोक नेते,भंडारा खासदार सुनिल मेंढे,वर्धा खासदार रामदास तडस,अमरावती खासदार नवनीत राणा,बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव,जळगाव खासदार उन्मेष पाटील,नाशिक खासदार हेमंत गोडसे,मा अध्यक्ष रेल्वे बोर्ड नवी दिल्ली,जनरल मॅनेजर मध्य रेल्वे,डिव्हिजनल रिजनल मॅनेजर नागपुर/भुसावळ/मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

Latest News