राजकारणात सगळे काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

मुंबई : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

मुंबईतल्या राजकारणावर आता वर्चस्व केवळ भाजपचे असावे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. 2019 मधे पहिल्यांदा भाजपचे संपूर्ण बहुमताचे सरकार आले. असे पहिल्यांदाच झाले. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती, असा आरोपही अमित शहा यांनी केला.

भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ असे म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असेही शहा यांनी सांगितले.महाराष्ट्रातले हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे असल्याचे शहा यांनी सांगितले. यामुळे भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट झाली.

तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे हल्लाबोल शहा यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असावे, असेही त्यांनी सांगितले. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचेही शहा यावेळी म्हणाले.राजकारणात काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.

अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. शहा म्हणाले की, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला आहे. राजकारणात सगळे काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका, असे अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले

Latest News