छत्रपती शिवाजी महाराज दिल्ली समोर कधीही झुकले नाहीत पण आज शिंदे सरकारचे सर्व निर्णय दिल्लीतून


मुंबई : (ऑनलाइन परिवर्तनाचा सामना -) महाराष्ट्राविरोधात दिल्लीतून कट शिजत आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीसमोर कधीही झुकले नाहीत पण आज शिंदे सरकारचे सर्व निर्णय दिल्लीतून होत आहेत. सत्तेच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना भेटी देणे, सत्कार घेणे आणि आमच्यावर टीका करणे याशिवाय कोणतही काम केलेलं नाही. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रोजेक्क्ट मिळत असेल तर ठीक पण महाराष्ट्राचा प्रोजेक्ट तिकडे गेला त्यामुळे नोकऱ्या जाणार आहेत,राज्य सरकारला विनंती आहे विषय राजकीय करू नका,सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढा, असही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधक- आणि सत्ताधाऱ्यामध्ये राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून दबाव वाढल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवरच आरोप केले आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील राज्य सरकारवर टीकेचा आसुड ओढला आहे
”गुजरातच्या नेत्यांचा आशिर्वाद राहीला पाहिजे, म्हणून महाराष्ट्रातील भाजप नेते हे करताहेत मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला हवं, पण ते मोदी शहा म्हणतात तसं ऐकतात. आपल्या राज्याच्या वाट्याचं पाणी गुजरातला पाठवलं. उद्या मुंबईच गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको, असं नाना पटोले यांनी म्हटले आहे.
तसेच, गुजरातला नेलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत यायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन केंद्र सरकारकडून महाराष्ट्र आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.