दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, आरपीआय मातंग आघाडीचे हनुमंत साठे यांचे निधन…


पुणे :(. ऑनलाइन परिवर्तनाचा सामना -) दलित समाजाच्या विविध प्रश्नांसाठी लढा देणारे, दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, आरपीआय मातंग आघाडीचे हनुमंत साठे (hanumant sathe) यांचे काल (ता. १३) निधन झाले
.आंबेडकरी चळवळीत कार्यकर्ते हनुमंत साठे यांच्या मागे मुलगा विरेन , पत्नी सत्यभामा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. साठे यांच्या पार्थिवावरत्यांच्यावर आज (१४) धनकवडी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित राहणार आहेत . लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथील त्यांच्या घराचे पहिल्यांदा पुनर्वसन त्यांनी केले
दलित समाजाच्या विविध प्रश्नांसाठी साठे कायम लढा दिला. पुण्यासह महाराष्ट्रभर त्यांच्या कामातून ओळख निर्माण झाली होती. आरपीआयमध्ये ३० वर्षापासून कार्य करीत असताना दलित समाजातील मातंग व इतर जातीतील समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे .