लाचखोर दुय्यम निबंधक मुकुंद कारंडे यांना निलंबीत करा – रणजीत दळवी

IMG-20220915-WA0223

लाचखोर अधिकारी श्री . मुकुंद कारंडे यांना निलंबीत करा -अॅड . रणजीत मधुकर दळवीनिलंबन न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा–अॅड . रणजीत मधुकर दळवी

पिंपरी- तुकडेबंदी व रेरा कायद्याचे उल्लंघन व मोठ्या प्रमाणात महसूल बुडवुन महसूल हानी केल्याबद्दल लाचखोर अधिकारी श्री . मुकुंद कारडे यांना निलंबीत करा -अॅड . रणजीव मधुकर दळवी , सह दुय्यम निबंधक कार्यालय , हवेली २४ या कार्यालयात कार्यरत असनारे दुय्यम निबंधक अधिकारी श्री . मुकुंद जगन्नाथ कारंडे हे सदरील कार्यालयात कार्यरत होते .

निबंधक अधिकारी श्री . मुकुंद जगन्नाथ कारंडे यांनी कार्यभार करत असताना बोगस दस्त नोंदणी करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केलेला आहे . सदर गैरव्यवहार व आपल्या पदाचा गैरवापर सदर काळ्या पैशातुन त्यांनी त्यांचे मुलीचे नावे तुकडे बंदी कायदा अधिनियम १ ९ ४७ मधील कलम ६२ कायदयाचे उल्लंघन करून गाव मौजे लोहगाव येथील सव्हें नं .४ ९ / १ या मिळकती बाबत चे दि . २७.०१ . २०१२ रोजी मे. दुय्यम निबंधक हवेली क २४ याचे कार्यालयात स्वतः कार्यरत असताना खरेदीखत दस्त क्र. १५ ९ १ / २०२२ अन्वये रक्कम रु. ९ , ३०,००० / – देऊन सदर मिळकत श्री . जितेंद्र कन्हैयालाल भंडारी व प्रदीप साहेबराव खांदवे यांचे मालकीचे क्षेत्र 00 से ३३.५ आर मधील क्षेत्र 00 हे ०१.११ आर हे स्वताच्या मुलीच्या नावाने म्हणजेच कु . मिताली मुकुंद कारंडे यांचे नावे खरेदी घेतलेले आहे

. तरी श्री . कारंडे यांनी सह दुय्यम निबंधक हवेली क . २४ या कार्यालयात कार्यरत असताना महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तवणूक ) नियम , १ ९ ७ ९ सेउल्लंघन करून व शासकीय सेवेचा पदाचा गैरवापर करून स्वतःच्या फायदयासाठी स्वतःच्या स्वाक्षरी ने खरेदीखत दस्त नोंदविला आहे

. तरी लाचखोर अधिकारी श्री . कारंडे यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याबद्दल विभागीय चौकशी करून अजुन बेनामी संपत्तीची चौकशी करून सदर अधिका – यावर महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तवणुक ) नियम १ ९ ७ ९ चे उल्लंघन व तुकडे बंदी कायदा अधिनियम १ ९ ४७ मधील कलम ६२ कायदयाचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून निलंबन करावे .

तसेच श्री कारंडे हे सह दुय्यम निबंधक हवेली २४ व हवेली २५ येथे कार्यरत असताना मोठया प्रमाणात बेकायदेशीर दस्त नोंदणी करून शासनाचा मोठया प्रमाणात महसुल बुडवुन व तुकडेबंदी व रेरा कायदयाचे उल्लंघन करून वैयक्तीक लाभापोटी आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे

तसेच त्यांनी मोठया प्रमाणात अवैध संपत्ती जमा केली आहे . त्याची विशेष पथकाव्दारे चौकशी करण्यात यावी व सदरील चौकशी पुर्ण होईपर्यंत त्यांना कुठल्याही कार्यालयात पदभार देण्यात येऊ नये . सदर बाब ही अतिशय गंभीर असुन यावर लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे.

Latest News