पिंपरी चिंचवड शहराला भेडसावणा-या कचरा डेपो ची आरक्षित पून्हावळे तील जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार : आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह


पिंपरी चिंचवड शहराला भेडसावणा-या कचरा डेपो साठीची. पून्हावळेची जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार : आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह
पिंपरी ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ).
पिंपरी चिंचवड शहराची दिवसेंदिवस हद्द वाढत असल्याने कचऱ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत त्यामुळे कचरा डेपो साठीची शहरात आरक्षित. असलेली पुन्हावळ्यातील जागा ताब्यात घेऊन कचरा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आयोजित. पत्रकार परिषदेत दिली
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्पावर तोडगा काढण्यास प्रयत्न करणार आहे, याकरिता स्थानिक शेतकरी, लोकप्रतिनिधी व राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, .“इंडियन स्वच्छता लीग” या मोहिमेची माहिती देण्यासाठी महापालिकेत आज (गुरुवार) पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त अजय चारठणकर, रविकिरण घोडके, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे उपस्थित होते.
सिंह म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात दररोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. याकरिता भामा-आसखेड आणि आंद्रा योजनेच्या प्रकल्पाला गती दिली आहे. शहरातील नागरिकांना आणखी काही दिवस दिवसाआडच पाणीपुरवठा सुरु राहील, मात्र, निघोजेचे 100 एमएलडी पाणी शहराला मिळाल्यास पाणी पुरवठा दररोज होण्यास मदत होईल. पण, किमान आॅक्टोबर अखेर वाट पाहावी लागेल.
शहराला दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असला तरी दोन दिवसाचे एकदाच पाणी दिले जात आहे. मागील तीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी दैनंदिन पाण्यात कपात केली नाही. दररोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. भविष्याचा विचार करुन नियोजन केले जात आहे. आंद्रा, भामा-आसखेडच्या पाणी आरक्षणासह इतर कारणांमुळे प्रकल्प रखडला.
आंद्रा 100 आणि भामा आसखेड प्रकल्पातून 167 असे 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पाण्याची परस्थिती सुधारण्यास मदत होईल. रखडलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबतही तोडगा काढण्यात येईल. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असेही आयुक्तांनी स्पष्ट सांगितले.
शहराचा खड्ड्यांचा प्रश्न गंभीर आहे. आपण खड्डे बुजविले तरीही आणखी रस्त्यावर खड्डे राहत आहे. ते सर्व खड्डे बुजविले जात आहेत. मात्र, काही रस्त्यांवर खड्डे अजूनही राहिले आहेत. त्याबाबत दुमत नाही. 15 ऑक्टोबरनंतर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेणार आहे. रस्त्यावर खड्डा पडल्यावर त्याला जबाबदार कोण, त्याचा दर्जा कोण तपासणार याबाबतचे धोरण निश्चित करुन संबंधितावर त्यांची जबाबदारी दिली जाणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले