मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपा चे माजी खा.छत्रपती संभाजीराजेंना दीड तास ताटकळत ठेवले?

मुख्यमंत्री शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दीड तास ताटकळत ठेवले?
मुंबई ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ). मराठा. आरक्षण प्रश्न वरती चर्चा करण्यासाठी आज दुपारी भाजपचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात गेले होते. येथे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना दीड ते दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. अखेर छत्रपती संभाजीराजे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून निघून जावे लागले.
मंत्रालयात आल्यानंतर संभाजीराजे यांनी प्रथम सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा आढावा घेतला. यानंतर ते मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनाकडे गेले.
परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास माजी खासदार संभाजीराजे यांना बाहेर ताटकळत उभे ठेवले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत दंग होते.
वारंवार निरोप देऊनही शिंदेंनी भेट देण्यास टाळाटाळ चालवल्याचे जाणवताच अखेर संभाजीराजे तडकाफडकी निघून गेले.दरम्यान, या प्रकारावर संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.