अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत, यांना काहीही कारण नसताना भाजपाने जेलमध्ये टाकले :शरद पवार

पुणे ( ऑनलाईन परिवर्तनांचा सामना ). –

“अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना जेलमध्ये टाकण्यात आले. भाजपवाल्यांनी त्यांना जेलमध्ये टाकले आणि आता आम्हाला सांगयेत की, आम्ही वाऱ्यावर सोडले. भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे,” पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी खासदार संजय राऊत सध्या कारागृहात आहेत. आज राऊतांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे संजय राऊत यांच्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचाआरोप भाजपचे नेतेमंडळी करत आहेत. यावर विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले,

चार दिवसांपूर्वीच त्यांच्या विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांनी सोमवारी भाष्य केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.शिंदे आणि ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्यावरून सध्या वाद सुरू आहे. त्यावर पवार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. शिंदे गटाला मेळावा साठी बीकेसीचे मैदान देण्यात आले आहे,”

राऊत सध्या याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून सोमवारी (ता. 19) त्यांच्या जामीन अर्जावर तसेच कोठडीबाबतही एकत्रित सुनावणी होणार आहे.पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती

. त्यानंतर राऊतांना प्रथम ‘ईडी’ आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.संजय राऊत यांच्यावर राजकीय सूडबुद्धी किंवा द्वेषातून कारवाई करण्यात आली नाही असे स्पष्टीकरण ‘ईडी’ने कोर्टासमोर दिले.सध्या राऊत हे ऑर्थर रोड कारागृहात आहेत.

Latest News