पुणे जिल्ह्यातील 46 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व…

, पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात जुन्नर तालुक्यातील एकूण ३६ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने २६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आंबेगाव तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायत या राष्ट्रवादीच्या विचाराच्या आल्या आहेत. तसेच, खेड तालुक्यात पाच ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती, भोर तालुक्यातील दोनपैकी दोन्हीही ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या आलेल्या आहेत, असा दावा जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी केला आहे
पुणे जिल्ह्याच्याउत्तर भागात एकूण ६१ ग्रामपंचायतच्यापंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज (ता. १९ सप्टेंबर) लागला. या निकालात तब्बल ४६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व मिळविले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradip Garatkar) यांनी दिली
आंबेगावमध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरमध्ये आमदार अतुल बेनके, खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते या आमदारांनी आपले गड कायम राखले आहेत, तर भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला धक्का दिला आहे
.गारटकर म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, विक्रम खुटवड यांच्या विचाराने विकास कामाच्या जोरावर ग्रामीण भागापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा ग्रामपंचायतने ग्रामपंचायतीच्या निकालातून दिसून येत आहे
या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांचा सर्वागीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निवडणुकीच्या निकालानंतर सांगितले