पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्याच्या खड्ड्याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारअधिकारी सल्लागार यांच्यावर कारवाई करा : सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर


पिंपरी :पिंपरी चिंचवड शहरात मागील आठ- दहा दिवसापासून पाऊस सुरु आहे. या पावसात नव्याने बनवण्यात आलेले डांबरी रस्ते वाहून जाणे या रस्त्यांवर खड्डे पडणे असे प्रकार समोर आले आहेत. रस्त्यांवर हे खड्डे पडले आहेत ते रस्ते बनवणारे ठेकेदार, अधिकारी, सल्लागार व गुणवत्ता नियंत्रण एजन्सी यांच्या संगणमताच्या भ्रष्टाचारामुळेच शहरवासीयांच्या जीविताला हा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेत त्या रस्त्यांच्या कामाची आपण चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी झालेला खर्च ठेकेदार, अधिकारी, सल्लागार व गुणवत्ता नियंत्रण एजन्सी यांच्याकडून वसूल करावा अशी. मागणी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहें

जुलै २०२२ ला पावसामुळे अशाच प्रकारे डांबरी रस्त्यांना खड्डे पडले होते त्यावेळी शहरातील आठ ही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील २३८ खड्डे डांबरणाने भरण्यात आले होते, ५३खड्डे बीबीएमने भरण्यात आले होते, ३९७ डब्लूएमएमने भरण्यात आले होते, ३२ खड्डे पेविंग ब्लॉगने भरण्यात आले होते, १२६ खड्डे मुरुम,खडीने भरण्यात आले होते

एकुण ८४६ खड्डे भरण्यात आले होते. ८०% खड्डे भरण्यात आले असुन २०% खड्डे भरण्याचे काम सुरु आहे असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते.
खरे तर हा आपल्या प्रशासनाच्या निकृष्ट व भ्रष्ट कारभाराचा पुरावाच शहरवासीयांच्या सामोरी आला होता. त्यावेळी हे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले होते.

आता पुन्हा रस्त्यांना खड्डे पडले आहेत. त्यातच काल दि. १२/०९/२०२२ रोजी पोलीस प्रशासनाचे लोक रस्त्यावरील खड्डे भरतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे हे खड्डे उर्वरीत न भरलेल्या २०% खड्यातील आहेत की काय ? महापालिकेला हे खड्डे भरण्यास वेळ मिळाला नाही काय ? खड्डे बुजविण्यासाठी बजेट कमी पडले अथवा ठेकेदार पळून गेला काय ? पोलीस प्रशासनानेच रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे टेंडर काढण्यास सुरुवात केली काय ? असे प्रश्न करदात्या नागरिकांसमोर उभे राहीले आहेत.

Latest News