ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – नोकरी सोडून त्यांनी सर्वज्ञ मिडिया हा ग्रुप काही मित्रांबरोबर सुरू केला. त्या माध्यमातून ते काम करत होते. फूड ब्लॉगर म्हणून ते प्रसिद्ध होते. मध्यंतरी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं.

आशिष चांदोरकर यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. शिंदेंनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राजकीय तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खाद्यसंस्कृती संदर्भात मौलिक योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचे आज निधन झाले.

चांदोरकर यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झालं आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑनलाइन या तीनही माध्यमांमधून प्रभावी पत्रकारिता केलेल्या आशिष चांदोरकर यांचं रहात्या घरी निधन झालं. रात्री झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.सकाळी त्यांनी घराचं दार लवकर उघडलं नाही म्हणून शेजाऱ्यांनी चौकशी केली आणि त्यांच्या मित्रांना बोलावलं. दार उघडल्यावर ते झोपलेले दिसले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यावर ते मृतावस्थेत असल्याचं समोर आलं.त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट शिंदेंनी केलंय. 

Latest News