भाजप विरोधी पक्षाच्या राज्यांमध्येच ED च्या कारवाई -दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया


नवी दिल्ली : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
दिल्लीच्या मद्य धोरणाविरोधात सीबीआयनं देशातील ३० विविध ठिकाणांसह सिसोदिया यांच्या घरावरही छापेमारी केली होती. याप्रकरणी ईडीनंही आर्थिक घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सिसोदिया हे अनेकांपैकी एक आरोपी आहेत ज्यांच्यावर सीबीआयनं दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यात एफआयआर दाखल झाला आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांच्या शिफारशीनुसार गुन्हा दाखल झाला
या छापेमारीत बंगळुरु, हैदराबाद, आंध्र प्रदेश, चेन्नई आणि दिल्ली-एनसीआरचा समावेश आहे. भाजपच्या ऑपरेश लोटससाठी CBI-ED एकत्र काम करत आहेत, असा गंभीर आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे
. भाजपच्या विरोधी पक्षांना टार्गेट करुन त्यांची सरकारं पाडण्याचं काम सुरु आहें सिसोदिया यांनी दिली , ज्यामध्ये राजकारण्यांविरोधातील ईडीच्या कारवाया विशेषतः जे भाजपविरोधी पक्ष आहे त्यांच्यावर या कारवाया केल्या जात आहेत
. भाजप सन २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून हे घडत आहे. यावर सिसिदियांनी म्हटलं की, “सध्याच्या काळात सीबीआय आणि ईडी या एकत्रितपणे आपरेशन लोटसची अंमलबजावणी करत आहेत. त्यांच्याकडील ९५ टक्के केसेसद्वारे ते निवडून आलेली सरकारं पाडण्यासाठी हत्यार म्हणून वापर करत आहेत. असंच जर सुरु राहिलं तर देशाची प्रगती कशी होईल