इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सवर झटपट कर्ज मिळवून देण्यासाठी कायनेटिक ग्रीनची टाटा कॅपिटलबरोबर भागीदारी….


Pune, २१ सप्टेंबर २०२२: इलेक्ट्रिक व्हेइकल्स (इव्ही) निर्मिती क्षेत्रातील भारताची अग्रगण्य कंपनी कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड, इंडियाने टाटा ग्रुपची प्रमुख वित्तीय सेवा शाखा असलेल्या टाटा कॅपिटलबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करू पाहणा-या ग्राहकांना कायनेटिक ग्रीनच्या भारतभरातील डीलरशीप्समध्ये डिजिटल पद्धतीने कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे.
हे कर्ज अवघ्या १५ मिनिटांमध्ये मंजूर होत असल्याने ते मिळविण्याची प्रक्रिया अगदी सहजसुलभ पद्धतीने पार पडते. या सहयोगाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षक व्याजदर, टू-व्हीलरच्या एकूण किंमतीच्या ८५% रक्कम कर्जस्वरूपात मिळणे, कर्जफेडीसाठी ३६ महिन्यांचा कालावधी आणि ग्राहकांच्या पात्रतेनुसार कमी ईएमआय असलेली कर्जयोजना असे अनेक फायदे मिळू शकणार आहेत.
या भागीदारीविषयी बोलताना कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक आणि सीईओ सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, “इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी सहज वित्तपुरवठ्यासाठी टाटा कॅपिटलबरोबर भागीदारी करत असल्याचा आम्हाला आनंद आहे. टाटा कॅपिटलकडून वित्तपुरवठ्याचे आकर्षक पर्याय दिले जात असल्याने पर्यावरणस्नेही वाहनांकडे ग्राहकांचा कल अधिक प्रमाणात वाढू शकेल व त्यांना कोणत्याही अडथळ्याविना विद्युत वाहनाच्या मालकीचा अनुभव मिळू शकेल. या सहयोगामुळे ही वाहने अद्याप अस्पर्शित असलेल्या बाजारपेठांपर्यंतही पोहोचण्यास मदत होईल आणि ही वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना कमीत-कमी कागदपत्रांनिशी सर्वोत्तम व्याजदरात सहज कर्जप्राप्ती होऊ शकेल, याची मला खात्री आहे.”
या भागीदारीविषयी बोलताना टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सरोश अमारिया असे म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे हे आता एक अटळ वास्तव बनत आहे. प्रथमच इव्ही खरेदी करणा-यांना (दुचाकी किंवा चारचाकी) आकर्षक करसवलतही मिळते. आमच्या सहज आणि परवडण्याजोग्या वित्तीय सेवांद्वारे कायनेटिक ग्रीनची टू-व्हीलर विकत घेणा-या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनाचा स्वीकार अधिक सहजपणे करता यावा अशी आमची इच्छा आहे. कायनेटिक ग्रीनसोबत दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरेल अशी भागीदारी साकारण्यास आम्ही उत्सुक आहोत. ”
विविध प्रकारच्या वित्तीय गरजा पुरविण्याची टाटा कॅपिटलची क्षमता आणि कायनेटिक ग्रीनची अभिनव, अद्ययावत निर्मिती इथून पुढेही भारताच्या वाहतुक क्षेत्राचे विद्युतीकरण करण्याच्या कामी पायाभूत काम करत राहणार आहे.
कायनेटिक ग्रीन विषयी
भारतातील सर्वसामान्य जनतेसाठी हरित वाहनांचा पर्याय घेऊन येण्याचे स्वप्न घेऊन २०१५ साली स्थापन झालेली कायनेटिक ग्रीन ही कंपनी म्हणजे कायनेटिक आणि फिरोदिया ग्रुप यांचा नवा व्यापारी प्रकल्प आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या क्षेत्रातील ही एक अग्रगण्य कंपनी असून कायनेटिक ग्रीन या ब्रॅण्डअंतर्गत कार्गो व प्रवासी वाहतुकीसाठीच्या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्स तसेच इलेक्ट्रिक स्कूटर्ससारख्या बॅटरीवर चालणा-या वाहनांची विस्तृत श्रेणी या कंपनीने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने आजवर ४५,००० हून अधिक इलेक्ट्रिक व्हेइकल्सची यशस्वी रचना, निर्मिती व समग्र विक्री केली आहे आणि ५०० कोटी रुपयांच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे. एआरएआय मान्यताप्राप्त इलेक्ट्रीक थ्री-व्हीलर विकसित करणारी तसेच भारतामध्ये आपल्या ऑटोंसाठी लिथियम-आयन बॅटरी तंत्रज्ञान पुरविणारी कायनेटिक ग्रीन ही पहिली कंपनी आहे. लक्षावधी लोकांना वाहनाची सोय उपलब्ध करून हे कायनेटिक ग्रीनचे मिशन आहे. कंपनीच्या ५०० हून अधिक डीलरशीप्स भारताच्या २० हून अधिक राज्यांतील ग्राहकांना आपली सेवा पुरवित आहेत.
टाटा कॅपिटल विषयी
टाटा कॅपिटल लिमिटेड ही एक सर्वसमावेशक वित्तीय सेवापुरवठादार कंपनी असून किरकोळ विक्री, कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ग्राहकांच्या विविध प्रकारच्या गरजा कंपनीकडून पुरविल्या जातात. कंपनीद्वारे दिल्या जाणा-या सेवांमध्ये कन्झ्युमर फायनान्स, सल्लागार सेवा, कमर्शियल फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, मायक्रोफायनान्स, प्रोजेक्ट फायनान्स, डेब्ट सिंडिकेशन, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, प्रायव्हेट इक्विटी सल्लागार सेवा आणि क्रेडिट कार्ड अशा विविध सेवा पुरविल्या जातात. टाटा कॅपिटलविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया www.tatacapital.com इथे भेट द्या.

Latest News