महाविकास आघाडी सरकार गेल्याने अजित पवार यांना रस्त्यावरचे खड्डे दिसू लागलेत- डॅा. भारती पवार


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना नाशिक :
महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आता राज्यात भाजपच्या (BJP) सहकाऱ्यांने एकनाथ शिंदे (सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे अनेकांना मोकळा वेळ मिळालेला दिसतो. जुने सरकार गेल्याने अजित पवार यांना रस्त्यावरचे खड्डे दिसू लागलेत का? अशी टिका केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा. भारती पवार ( यांनी केली आहे.
– डॅा. भारती पवार यांच्या उपस्थितीत शहरात काल विविध विभागांच्या कामकाजांचा आढावा घेण्यात आली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या
त्या म्हणाल्या, राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांना महाविकास आघाडी सत्तेत होती, त्यावेळी खड्डे दिसले नाहीत का, त्यांच्याही काळात खड्डे होते अन आताही आहेत, फरक फक्त एवढाच आहे की, त्यावेळी ते खड्डे दादांना दिसत नव्हते आता दिसतात, असा आरोप केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी केला.
महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व पंजाब या राज्यांमध्ये लम्पी व्हायरसचा धोका वाढत आहे. ज्या ठिकाणी व्हायरसमुळे जनावर बाधित झाले आहे, तेथील पाच किलोमीटर परिघातील सर्व जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात या आजारावरील तीन कोटी लशी उपलब्ध असून नाशिकची मागणी पूर्ण केली जाईल. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ गायींचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गायींमुळे मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. बाधित गायींच्या दुधामुळे काही होणार नाही, दूध गरम करून घ्यावे, असे मंत्री पवार यांनी सांगितले.