महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवाकर विभागाची करचोरी आणि फसवणूक करणा-यांवर धडक कारवाई

महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवाकर विभागाची करचोरी आणि फसवणूक करणा-यांवर धडक कारवाई.

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर प्रणालीच्या विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि विभागाच्या संकेत स्थळावरील उपलब्ध माहितीद्वारे करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना, विभागाच्या लक्षात आले की, मे. सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्स / सनराइज मिल मेल / सनराइज केमिकल्स यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि केमिकल्सचा व्यवसाय असून त्यांनी अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवांच्या प्रत्यक्ष पुरवठयाशिवाय मिळविलेल्या खोट्या खरेदी देयकांद्वारे जीएसटी कर बुडविला आहे.

अन्वेषण तपासणीमध्ये मे सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्स / सनराइज मिल मेल / सनराइज केमिकल्सचे मालक हिरेन परेश पारेख यांनी अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठयाशिवाय सुमारे ८८.८४ कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचा Input Tax Credit प्राप्त करुन घेतला व त्याद्वारे जीएसटी कर रुपातील महसूल बुडविला असल्याचे सिद्ध झाले. सबब मे सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्स / सनराइज मिल मेल / सनराइज केमिकल्सचे मालक हिरेन परेश

पारेख यांना दि. २३/०९/२०२२ रोजी राज्य वस्तू व सेवाकर विभाग पुणे यांनी वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अंतर्गत अटक केली.मा. मुख्य न्याय दंडाधिकारी, पुणे यांनी आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संपूर्ण कारवाई श्री दीपक भंडारे (राज्यकर सहआयुक्त) पुणे यांच्या नेतृत्वाखाली व श्री सुधीर चेके (राज्यकर उपायुक्त) यांच्या देखरेखीखाली तपास अधिकारी श्री श्रीकांत खाडे (सहायक राज्यकर आयुक्त ), श्री ऋषिकेश अहिवळे (सहायक राज्यकर आयुक्त ) श्री प्रदीप कुलकर्णी (सहायक राज्यकर आयुक्त ) आणि राज्यकर निरीक्षक यांच्या पथकाने पार पाडली.
श्री धनंजय आखाडे (अपर राज्यकर आयुक्त) पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई पार पडली.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवाकर विभागाने आजपर्यंत सदर अटकेसह ४३ विविध प्रकरणात अटक केल्या आहेत यामुळे खोटया व बनावट कागदपत्रांच्या आधारे वस्तू व सेवाकराच्या करचोरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना एक ठोस इशारा मिळाला आहे. राज्य वस्तू व सेवाकर विभाग अशा प्रकारच्या गुन्हयात सामील असणा-या व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही. यासंदर्भात पुढील तपास सुरु आहे.

Latest News