सुखकर्ता स्पर्धेत कै. किरण ऊर्फ सूर्यवंशी प्रतिष्ठान प्रथम पुणे,


सुखकर्ता स्पर्धेत कै. किरण ऊर्फ सूर्यवंशी प्रतिष्ठान प्रथम
पुणे, प्रतिनिधी : कॅप्टन ए. एन.कुरेशी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सुखकर्ता स्पर्धा २०२२ चे निकाल जाहीर करण्यात आले असून, या स्पर्धेत विधायक उपक्रम आणि विधायक गणेशोत्सव साजरा करणारे मंडळ म्हणून कै. किरण ऊर्फ सूर्यवंशी प्रतिष्ठानसह संघर्ष मित्र मंडळ, औंध रोड या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाने द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळी मनोज सूर्यवंशी, शुभम कवाळे, सुमित मोरे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जाधव, साई पवार, तेजाराम अग्रवाल, ऍड. पवळे, ऍड. विठ्ठल आरुडे, इसार कुरेशी, दत्ता सूर्यवंशी, विजय जाधव, इंद्रजीत भालेराव, जीवन घोंगडे, सतीश शहा, मंडळाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सवा दरम्यान कॅप्टन ए. एन.कुरेशी फाऊंडेशनच्या वतीने सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.