”शिवसेना चिन्हावर” निकाल देताना आमदार, खासदारांची संख्या महत्वाची….ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – आता सर्व स्तरांतून तर्क वितर्क लढविले जात आहेत. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी अशा स्वरुपाच्या वादात निर्णय कसा घेतला जातो, यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी निकाल देताना आमदार आणि खासदारांची संख्या महत्वाची ठरणार आहे. सोबत पक्षाच्या घटनेलाही महत्व प्राप्त होणार असून, तिचा देखील विचार केला जाणार आहे, असे सूचक वक्तव्य उज्वल निकम यांनी केले
शिवसेना (Shivsena) विरुद्ध एकनाथ शिंदे (यांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात दोन दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगावरील बंधने उठवत शिवसेना कोणाची, आणि निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा? हे निर्णय घेण्याची परवानगी आयोगाला दिली.तसेच अशा प्रकणात आयोग तोंडी पुरावा आणि लेखी कागदोपत्री पुरावा यांच्या आधारे निर्णय घेतो. ज्या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे, त्यांची घटना आयोगाकडे असते. त्यामुळे आयोग त्याचा विचार करुन निर्णय देतो, असे देखील निकम म्हणाले.