मुंबईत रिक्षा भाडेवाढीचा फेरविचार करा ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू ः बाबा कांबळे


*मुंबईत रिक्षा भाडेवाढीचा फेरविचार करा ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू ः बाबा कांबळे
*- *मुंबई येथे रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेचे आयोजन* – *बेकादेशीर टू व्हीलर, रॅपिड वाहतूक बंद करण्याची बाबा कांबळे यांची मागणी* *
मुंबई / प्रतिनिधी*मुंबई येथे दोन रुपये मीटर रिक्षा मीटर भाडेवाढ झाली आहे. पुण्यात नुकतीच महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर संघटनेच्या सहकार्याने चार रुपये रिक्षा मीटर भाडेवाढ करून घेण्यात आली आहे. याच धरतीवर मुंबईत देखील किमान चार रुपये रिक्षा भाडेवाढ मिळाली पाहिजे. सरकारने जाहीर केलेले तुटपुंजी 23 रुपये भाडेवाल बाबत फेरविचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ऑटो टॅक्सी, रिक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. या वेळी मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट युनियन मुंबई अध्यक्ष जावेद देऊळकर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत मुंबई प्रदेशाध्यक्ष विजय देसाई, कार्याध्यक्ष साजिद सय्यद, ठाणे जिल्हा अध्यक्ष आशिष देशपांडे, कल्याण डोंबिवली अध्यक्ष शिवाजी गोरे, मुंबई संघटक अक्षय साळवे, मुंबई कार्यकारणी सदस्य फायाज शेख, रईज खान, ताहीर मुजावर, आदी उपस्थित होते.मुंबई ऑटो रिक्षा, टॅक्सी ट्रान्सपोर्ट युनियनची नव्याने स्थापना करून त्याच्या अध्यक्षपदी स्वर्गीय शरद रावांच्या सोबत वीस वर्षापेक्षा अधिक दिवस काम करणारे जावेद देऊळकर, यांची मुंबई अध्यक्षपदी, घोषणा करण्यात आली आहे. जावेद देऊळकर म्हणाले स्वर्गीय शरद राव यांनी मुंबईत रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी फार मोठे काम केले. हकीम व खटवा समिती स्थापन करण्यात त्यांचा खूप मोठे योगदान राहिले आहे. मुंबईमध्ये मीटर दरवाढीबद्दल स्वर्गीय शरद राव नेहमी आग्रही असत. सीएनजीचे दर वाढले आहेत. यामुळे सीएनजीसाठी केंद्र सरकारकडून 25 व राज्य सरकारकडून 25 टक्के अनुदान मिळावे. जोपर्यंत अनुदान मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला हकीम समितीच्या सूत्रानुसार २५ रुपये रिक्षाची भाडेवाढ द्यावी. खरे तर आम्हाला भाडेवाढ नको आहे. परंतु सीएनजीच्या किमतीमुळे ही भाडेवाला आम्हाला घ्यावी लागत आहे. सरकारने सीएएनजी मध्ये 50 टक्के अनुदान दिले, तर आम्ही भाडेवाडी बद्दल, पुनर्विचार करू. परंतु जोपर्यंत अनुदान मिळत नाही, तोपर्यंत भाडेवाढ मात्र आम्हाला मिळाली पाहिजे. तो आमचा हक्क आहे. हकीम कमिटीच्या सूत्रानुसार ही भाड्यावर मिळावी आमची आग्रही मागणी आहे असे यावेळी मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष जावेद देऊळकर, म्हणाले. बाबा कांबळे म्हणाले की, शरद राव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली. त्याचा मी महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे. कृती समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये असंख्य संघटना जोडल्या. या संघटनांच्या वतीने रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावे, महाराष्ट्र मध्ये मीटर बद्दल एकच दर असावेत, रिक्षा चालकांना घरकुल मिळावे, सार्वजनिक सेवेचा दर्जा मिळावा, टू व्हीलर बाइक, ओला उबेर मधून होणारे बेकादेशीर वाहतूक बंद व्हावी अशा विविध मागण्यासाठी लढा देत आहोत. परंतु शशांक राव यांनी कोणत्याही संघटनांना विश्वासात न घेता व कृती समितीची बैठक न बोलवता स्वयंघोषित अध्यक्ष झाले आहेत. याबद्दल महाराष्ट्राच्या सर्व ऑटो चालकांमध्ये नाराजी आहे. सर्व संघटनांची एकत्रित बैठक बोलावून रीतसर चर्चा करावी. सर्वांच्या सहमतीने अध्यक्ष करू. रिक्षा चालक, मालक संघनेतील दुफ़ळीमुळे प्रश्न मार्गी लागणार नाहित. एकत्रित काम करू असे आवाहन या वेळी बाबा कांबळे यांनी केले. तसेच रखडलेले प्रश्न महाराष्ट्र शासनाने सोडवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहें