डी.सी.एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या महाविद्यालया संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

IMG-20220930-WA0173

डी.सी.एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या महाविद्यालया संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांची डी.सी.एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेला सदिच्छा भेट
पुणे, प्रतिनिधी :
पुण्यातील डी.सी.एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे या संस्थेच्या प्रस्तावित महाविद्यालयाला परवानगी देण्याविषयी गांभीर्याने विचार करणार आहे. आठवडाभरात संस्थेसोबत बैठक बोलावून हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पुण्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


पाटील यांनी डी.सी.एम. सोसायटी ऑफ इंडिया संस्थेला भेट देऊन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालयाची माहिती घेतली. तसेच कालकथीत एम.डी. शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे होते. यावेळी अध्यक्ष डी. टी. रजपूत, सिद्धार्थ शेवाळे यशोधन शेवाळे शिल्पाताई भोसले, काजल शेवाळे, वर्षा पाटील व संपूर्ण शेवाळे कुटुंबीय प्राचार्य डॉ. नरेश पोटे, उपप्राचार्य डॉ. जे.के. म्हस्के, डॉ. बाळासाहेब सोनवणे, कार्यालय अधीक्षक किशोर भुजबळ शुभदा नगरकर, सुनिता भोसरीकर, राजेंद्र भिंताडे, सरपंच स्नेहलताई दगडे, आरपीआयचे परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, शैलेश चव्हाण महेंद्र कांबळे, मोहन जगताप, संजय सोनवणे, अशीत गांगुर्डे, मंदार जोशी, डीसीएम संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की या संस्थेला जी मदत लागेल, ती पुरविणार आहे. विशेषतः कौशल्य विकास अभ्यासक्रम देऊन वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसायासाठी मदत होईल. याबरोबरच वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम संस्था करीत आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. कालकथीत एम.डी. शेवाळे यांचे कार्य मोठे आहे. शिक्षणावर अतोनात प्रेम करणारे होते. त्यामुळेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य त्यांनी पुढे नेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी, तर आभार प्रा. रमेश जमदाडे यांनी मानले.

Latest News