भारतीय विद्या भवनमध्ये कोजागिरीनिमित्त मैफल……’शब्दरूप आले मुक्या भावनांना’ मैफिलीचे ८ ऑक्टोबर रोजी आयोजन


भारतीय विद्या भवनमध्ये कोजागिरीनिमित्त मैफल
……………………………………………
‘शब्दरूप आले मुक्या भावनांना’ मैफिलीचे ८ ऑक्टोबर रोजी आयोजन
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मराठी युगुलगीतांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शब्दरूप आले मुक्या भावनांना ‘ असे या मैफिलीचे नाव आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शनीवार, ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले आहे.
‘जतन, पुणे ‘ प्रस्तुत या कार्यक्रमात सचिन घनपाठी, गौरी कुंटे, पल्लवी आनिखिंडी हे गीते सादर करणार आहेत. मिहिर भडकमकर ( की-बोर्ड), अक्षय पाटणकर(तबला),हेमंत पोटफोडे( साईड ऱ्हीदम) हे साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४२ वा कार्यक्रम आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.