पुण्यातील २ विद्यार्थ्यांना मिळाली ग्लोबल सिटीझन स्कॉलरशिप


पुणे, 1st October: सिंगापूरमधील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या शिक्षणासाठी निधी देणाऱ्या ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलची प्रतिष्ठित योजना – ग्लोबल सिटीझन स्कॉलरशिपच्या १५व्या गटात भारतभरातील १७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.पुण्यातील दोन विद्यार्थी यामोली व्यास आणि परी भटनागर या प्रतिष्ठित स्कॉलरशिपअंतर्गत सिंगापूरमधील हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण करतील.जवळपास ६००० विद्यार्थ्यांनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. या स्कॉलरशिप्स संपूर्ण अर्थसाह्य करणारी स्टडी बाँड आहे आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांना सिंगापूर येथील मुख्यालय असलेल्या जीआयआयएस स्मार्ट कॅम्पसमध्ये शिक्षण घेण्याची संधी देते. फ्लॅगशिप स्मार्ट कॅम्पसमधून यापूर्वी शेकडो विद्वान बाहेर पडले आहेत, जे जगभरातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी गेले आहेत.विद्यार्थ्यांची निवड एक कठीण परीक्षा-आणि-मुलाखत प्रक्रियेनंतर करण्यात आली, जी त्यांची भूतकाळातील शैक्षणिक कामगिरी देखील विचारात घेते. निवडलेले विद्यार्थी पुढील दोन वर्षे तंत्रज्ञानदृष्ट्या माहितीपूर्ण परिसर स्मार्ट कॅम्पसमध्ये शिक्षण घेतील. हा कॅम्पस् डिजिटल सुविधा, नवीन शिक्षण पद्धती आणि अनुभवी शिक्षकांसाठी ओळखला जातो.निवडलेल्या विद्वानांचा सत्कार करण्यात आला आणि ग्लोबल स्कूल्स फाऊंडेशनच्या वरिष्ठ व्यवस्थापनाद्वारे त्यांच्या पुढील विद्यार्थी-जीवनासाठी अभिमुखता देण्यात आली, ज्याचा एक भाग जीआयआयएस आहे. ही स्कॉलरशिप प्राप्तकर्त्यांना हायस्कूल वर्षांसाठी सीबीएसई किंवा आयबीडीपी अभ्यासक्रमामधून निवडण्याची सुविधा देते. विद्यार्थ्यांना लॉजिंग व बोर्डिंग सुविधा आणि प्रत्येक महिन्यासाठी स्टायपेंड देखील दिला जाईल. एकूण खर्च प्रति विद्यार्थी ९०,००० डॉलर्स इतका येतो. दोन वर्षांच्या शेवटी जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येईल.सत्कार समारंभात पालक व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करत जीएसएफच्या अकॅडेमिक क्वॉलिटी अशुअरन्सचे संचालक श्री. प्रमोद त्रिपाठी म्हणाले, ‘’या विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण व प्रगत शिक्षण अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आमच्या प्रमुख सिंगापूर स्मार्ट कॅम्पसमध्ये ग्लोबल सिटीझन स्कॉलरशिप (जीसीएस)चे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सर्वांगीण कामगिरी करण्यासाठी आणि भविष्यातील जागतिक नागरिक होण्यासाठी तयार करणे हे आहे. विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव अनुभव वैयक्तिक विकास, शिक्षण आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अनेक संधी देईल.’’ निवडलेल्या १७ विद्यार्थ्यांमध्ये गुरगाव, पलक्कड, जमशेदपूर, सुरत, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, डेहराडून, कालिकत आणि चंदीगड येथील विद्यार्थी आहेत.‘’या स्कॉलरशिपमुळे आम्ही माझ्या मुलाच्या स्वप्नाला पाठिंबा देऊ. त्याला सिंगापूरमध्ये उच्च शिक्षण घेता येण्याचा आनंद झाला आहे. माझ्या मुलाला यूट्यूबवर या स्कॉलरशिपबाबत समजले. त्याने या स्कॉलरशिपमध्ये रूची दाखवण्यासोबत स्वत:हून अर्ज प्रक्रियेबाबत फॉलो अप घेतले आणि तयारी केली. या उपक्रमाच्या माध्यमातून जीआयआयएस तरूणांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याप्रती लक्षणीय योगदान देत आहे. या तरुणांसाठी शाळा करत असलेले प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे,” असे पुण्यातील परी भटनागरचे वडील कर्नल सोमेश भटनागर म्हणाले.यापूर्वी ग्लोबल सिटीझन स्कॉलरशिप (जीसीएस) माजी विद्यार्थ्यांना इम्पीरिअल कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल), सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस (यूसीएलए), जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया, युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न आणि हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी अशा काही नामांकित जागतिक युनिव्हर्सिटीजमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळाला आहे. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलचे ध्येय नेहमीच जगभरातील मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचे आहे. “स्कूल्स दॅट लर्न”ची सांस्कृतिक कल्पना जीआयआयएसने स्वीकारली आहे, ज्यामुळे प्रत्येक समुदाय सदस्य शैक्षणिक प्रक्रियेत समान सहभागी होतो. अशा सहभागामुळे आजीवन शिकण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन मिळते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक विकासात सक्रियपणे सहभागी होण्यास क्षमता मिळते