८ ऑक्टोबर रोजी औंध मध्ये ‘सुपर हिरो कार्निव्हल


८ ऑक्टोबर रोजी औंध मध्ये ‘सुपर हिरो कार्निव्हल ‘
…..पुणे :’इनोसंट टाईम्स ‘स्कुल यांच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी गणेशबाग सोसायटी (औंध )मध्ये ‘ सुपर हिरो कार्निव्हल ‘आयोजित करण्यात आला आहे.२ ते १३ वर्ष वयातील लहान मुले ,थेरपिस्ट आणि डॉक्टर्स त्यात सहभागी होतील.सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हा कार्निव्हल सुरु राहणार आहे.
सुपरमॅन,बॅटमॅन, हल्क, आयर्न मॅन या सुपरहिरोंशी संबंधित खेळांचा समावेश या कार्निव्हल मध्ये असणार आहे.सकाळी ‘इनोसंट टाईम्स स्कुल ‘आणि ‘ अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीडस् ‘ च्या नवीन इमारतीचे उदघाटन होणार आहे. अर्ली इंटरव्हेंन्शन प्रोग्राम फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीडस् ‘ , डे केअर,नर्सरी,ज्युनिअर के जी,सिनियर के जी च्या सर्वंकष शिक्षण (inclusive education ) शिक्षणाच्या सुविधा आहेत. अशी माहिती ‘इनोसंट टाईम्स स्कुल ‘ च्या संस्थापक डॉ. अंकिता संघवी यांनी दिली.
स्वमग्नता (ऑटिझम) असलेल्या बालकांची विशेष काळजी विविध उपक्रमातून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.अंकिता संघवी या बालकल्याण संस्थेत ‘ अर्ली इंटरव्हेंन्शनीस्ट ‘ म्हणून विशेष मुलांसाठी, दिव्यांग मुलांसाठी कार्यरत आहेत…………