चंद्रपुरचे पर्यावरण जपण्यासाठी सत्याग्रही मार्गाने प्रयत्न : बंडू धोत्रे महात्मा गांधी सप्ताहानिमित्त व्याख्यान……….

IMG-20221006-WA0180

गांधीसप्ताहानिमित्त व्याख्यान…………………………………चंद्रपुरचे पर्यावरण जपण्यासाठी सत्याग्रही मार्गाने प्रयत्न : बंडू धोत्रे

पुणे :कोळशाच्या खाणीमुळे उडणाऱ्या धुळीने चंद्रपुरमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अजून खाणी प्रस्तावित आहेत. त्याविरोधात आम्हा स्थानिक रहिवाशांचे प्रयत्न सुरु आहेत. ताडोबा अभयारण्यातील वाघांमुळेही स्थानिक सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले आहेत , पर्यावरण रक्षणासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने उभे आहोत, अशी माहिती ‘ इको- प्रो ‘ संस्थेचे संस्थापक बंडू धोत्रे यांनी दिली.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त गुरुवारी सायंकाळी ‘ पर्यावरण रक्षणासाठी सत्याग्रह ‘ या विषयावर बंडू धोत्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन अध्यक्षस्थानी होते. गांधीभवन, कोथरुड येथे हा कार्यक्रम झाला.बंडू धोत्रे म्हणाले, ‘चंद्रपूर शहराला तीन बाजूंनी कोळशाच्या खाणींनी वेढले आहे. चौथ्या बाजूला असलेले एकमेव जंगल आगामी प्रकल्पांनी नष्ट होऊ शकते.कोळशाच्या भुकटीने फुफ्फुसे धोक्यात आली आहेत. अडाणी यांच्या कोळसा प्रकल्पांविरुद्ध आम्ही उभे राहिलो. युवकांच्या पुढाकाराने लोकलढे उभारून आम्ही पर्यावरण जपत आहोत.

तसेच वाघ, सर्प हे पर्यावरणाचे घटक जपण्यासाठी ही आम्ही इको – प्रो ‘ संस्थेच्या पथकांच्या माध्यमातून कार्यरत आहोत.अध्यक्षस्थानावरून बोलताना अन्वर राजन म्हणाले, ‘सरकारी यंत्रणांना सामाजिक, पर्यावरण प्रश्नांची जाणीव नसले तर हे प्रश्न गंभीर होतात. आदिवासी आणि पर्यावरणाचे नाते तुटणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे……..

Latest News