चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी…

ऑनलाईन परिवतर्नाचा सामना- धनुष्यबाण या चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गट आणि शिवसेनेकडून कागदपत्रं सादर करण्यात येत आहेत. शिवसेनेकडून आज निवडणूक आयोगापुढे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भाने निवडणूक चिन्हाबाबत दावा केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार नाहीत. मग ते चिन्हा मागण्याची घाई का करत आहेत, असे म्हणणे शिवसेनेकडून निवडणूक आयोगापुढे मांडण्यात आले

. निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घ्यायला, सध्या आणीबाणीची स्थिती नाही. त्यामुळे निवडणूक चिन्हाबाबत तात्काळ सुनावणी घेण्यात येऊ नये, असे म्हणणे शिवसेनेकडून मांडण्यात आले आहे

. तत्काळ निवडणूक घेऊ नये, यासाठी शिवसेनेकडून जी तीन कारणे निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहेत. त्यापैकी वरील एक आहेदरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात या अगोदर आमचा म्हणजेच शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, अशी मागणीही शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांचा गट अंधेरीपूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतउमेदवारच उतरवणार नाहीत, त्यामुळे ते निवडणूक चिन्ह का मागत आहेत, दावा शिवसेनेकडूनकेंद्रीय निवडणूक आयोगापुढे केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात अगोदर आमचाच आमदार होता, त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्हाचा निर्णय ‘जैसे थे’ ठेवा, अशी मागणीही शिवसेनेने आयोगाकडे केली आहे.

Latest News